आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
आधुनिक केसरी न्यूज
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील आडगाव पि. माळुबाई फाटा येथे सोमवार दिनांक १६ मार्च रोजी शेतकरी राजू शंकर चव्हाण यांच्या गट नंबर 154 मध्ये हे शेतकरी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान गुरांना चारापाणी करत असताना. त्यांना हरीण जखमी अवस्थेत दिसली त्यांनी तत्काळ त्या हरणास आपल्या गाय गोठ्यामध्ये सुरक्षित ठेवले. व तत्काळ निसर्ग मित्र देविदास थोरात व अमोल भोसले यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी तत्काळ वनपाल शेख व वनरक्षक इंगळे यांना माहिती दिली. अकरा वाजेच्या सुमारास. वन विभागाचे कर्मचारी सय्यद आरेफ ,अशोक भिवसने व निसर्ग मित्र त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी बघितल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी तय्यब आत्तार यांना फोन करून सांगितले त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशु दवाखान्याचे कर्मचारी पालोदकर यांनी प्रथमोपचार केला. त्यानंतर राजू चव्हाण, निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी त्या हरणास गवत टाकले ,पाणी पाजले. त्यानंतर दोन तासानंतर ती चांगली अवस्थेमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्या हरणास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . याप्रसंगी शंकर चव्हाण शेतकरी देखील उपस्थित होते.
पशुपक्षी जखमी अवस्थेत दिसल्यास वन विभागाशी संपर्क करा.
उन्हाळा ऋतू सुरू झाला असून दिवसेंदिवस जास्त तापमानामुळे प्राणी पक्षी अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करतात त्यामुळे काही वेळा जखमी देखील होतात त्यामुळे आपण माणुसकी धर्म जोपासत व घाबरून न जाता तत्काळ वन विभागाशी संपर्क करावा किंवा माझ्याशी संपर्क करावा आपण त्या प्राण्या किंवा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करू अशी विनंती निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी केली आहे.
डोंगरात आग लागू नये यासाठी दक्षता घ्यावी
मित्रांनो उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे पावसाळा सुरू होईपर्यंत डोंगर परिसरात जंगलात आग लागणार नाही याची दक्षता सर्वांनीच यावी. दरवर्षी आपल्याला डोंगर परिसरात जंगलात आग लागलेली कुठे ना कुठे बघायला मिळते. त्यामुळे जंगलातील डोंगर परिसरातील हजारो झाडे, वनस्पती जळून नष्ट होतात. त्याचबरोबर जंगलामध्ये पशुपक्षी वन्यप्राणी ही असतात त्यांचे कुटुंब असते त्यामुळे आपण जबाबदार नागरिक म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे व सर्वांनी कुठेही आपल्या चुकीमुळे आग लागणार नाही याची काळजी घ्यावी ज्याप्रमाणे आपले कुटुंब आहे त्याचप्रमाणे पशुपक्षी यांचे देखील कुटुंब आहे आणि पशुपक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र आहे तर पर्यावरणामुळेच आपण सुरक्षित आहे त्यामुळे आपले कर्तव्य आहे की पर्यावरणाला कुठेही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List