नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 

नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : मी मारणे गॅगचा शुटर असून बसस्थानकातील  तक्रार पेटीत बाॅम असल्याची चिट्टी ठेवली असल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करणार्या एकाला वजिराबाद पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. दरम्यान सदरील अफेवने पोलिस दलात खळबळ माजली होती.

याबाबतची अधिक माहिती अशी ५ मार्च रोजी एका मोबाईल वरुन पोलिस नियंत्रण कक्षातील दुरध्वनी वर एका अज्ञात इसमाने फोन करुन मी मारणे गॅगचा शुटर असून बसस्थानक येथील तक्रार पेटीत बाॅब असल्याची चिट्टी ठेवली असून बाॅब ब्लास्ट होणार असल्याचे दुरध्वनी वरुन सांगितले. पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांना कळवून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस कर्मचारी कारले यांना तातडीने बसस्थानक येथील तक्रार पेटीची चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिस अंमलदार कारले यांनी बसस्थानक येथे जाऊन तक्रार पेटी उघडून बघितले असता त्या तक्रार पेटीत एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीत बाॅब ब्लास्ट करण्यासंबंधी मजकूर असल्याचे कळविले. पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने एक पथक तयार करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षाला आलेल्या दुरध्वनीधारक यांचा सायबर सेलचे वतीने चौकशी केली. त्यावेळी सदर मोबाईल हा एका पाणीपुरी विक्रेते यांचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर पाणीपुरी विक्रेते यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एका अज्ञात इसमाने महत्वाचा फोन करायाचा आहे म्हणून मोबाईल घेतला होता. त्यांनी या मोबाईल वरुन नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर पाणीपुरी विक्रेत्यांकडून अधिक चौकशी करुन त्यांचे स्केच तयार करुन शोध घेण्यास सुरुवात केली. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक जगदिश भंडरवार व पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दोन पथक तयार करुन अज्ञात आरोपींची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा सदरील आरोपी हा अंबाजोगाई येथील रविवार पेठ मनियार गल्ली येथील शेख सलिम शेख चांद पाशा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने तातडीने अंबाजोगाई येथे धाव घेऊन आरोपी शेख सलिम शेख चांद पाशा यांना ताब्यात घेतले. त्यांची सविस्तर चौकशी केली असता त्यांनीच फोन केल्याचे सांगितले व बसस्थानक येथील तक्रार पेटीत बाॅब ब्लास्टची अफवा पसरवली असल्याची कबुली दिली. वजिराबाद पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बालाजी नागमवार यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला करुन त्यास अटक केली आहे. 

सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक जगदिश भंडरवार, वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू वाटाणे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी किरवले व पोलिस कर्मचारी मारोती मुसळे, शिवसांब मठपती, विशाल कदम, किशोर जैस्वाल यांनी केली आहे.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
नांदेड येथील बसस्थानक परिसरातील तक्रार पेटीत बाॅब ब्लास्टची अफवा पसरविणारा शेख सलिम शेख चांद पाशा हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक पोलिस ठाण्यात बाॅब ब्लास्टची अफवा पसरवली असल्याची गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलिस ठाण्यासह अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी सदरील आरोपींची झाडाझडती घेतली असून अंबाजोगाई पोलिसांनी सदर आरोपीस अनेक ठिकाणचे शोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक  नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : मी मारणे गॅगचा शुटर असून बसस्थानकातील  तक्रार पेटीत बाॅम असल्याची चिट्टी ठेवली असल्याचा पोलिस नियंत्रण...
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 
खाजगी वसतीगृहातील मुलीची गळफास लावून आत्महत्या; मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींच्या नातेवाइकांचा नकार 
माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा
दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात; अखेर मुंबईत सुखरूप आगमन
बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!