हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!

आधुनिक केसरी न्यूज 
 
 केदार शर्मा 
 
परतूर : विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांचे एक मे रोजी आकस्मिक निधन झाले या घटनेने संपूर्ण मतदारसंघासह जिल्हाभरात शोक कला पसरलेली होती त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजप माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर खासदार संजय जाधव, कपिल आकात, शिवाजी चोथे, अन्वर देशमुख, यांच्यासह मराठवाड्यातील अनेक गणमान्य लोकप्रतिनिधींनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन परिवाराचे सांत्वन केले.
आज शनिवारी सकाळी 11 वाजता जेथलिया यांच्याच विठ्ठला जिनिंग परिसरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी साश्रु नयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. 
 
महिलांनी हुंदके देतं काढल्या आठवणी 
सामान्य गरीब पासून सर्वाना प्रेमळ वागणूक देणाऱ्या नेत्याला निरोप देण्यासाठी महिलांनीही गर्दी केली. ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांसह पुरुषही हुंदके देत जेथलिया यांच्या आठवणीचा पाढा वाचत होते.
 सकाळी नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून विधिवत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गणमान्य लोकप्रतिनिधी सह त्यांच्या परिवारातील सदस्य नातेवाईक यांच्यासह हजारो समर्थकांची मोठी गर्दी होती. एक मोठ्या ट्रक मध्ये त्यांच्या पार्थिवाला ठेवून मुख्य मार्गावरून भजन कीर्तन सह नेण्यात आले.
 त्यांचे चिरंजीव नितीन व प्रवीण यांच्या हस्ते त्यांना मुखअग्नी  देण्यात आली.
 
नगरसेवक ते आमदार राजकीय प्रवास 
 
माजी आमदार जेथलिया यांनी पालिकेतून राजकीय श्रीगणेशा केला, दोनदा नगराध्यक्ष व यानंतर सतत त्यांच्या पत्नी नागराध्यक्षा राहिल्या. 35 वर्ष पालिकेवर एकाधिकार ठेवल्यानंतर 2026 मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. 2009 मध्ये अपक्ष आमदार होते, त्यांनी लोणीकर यांचा पराभव केला. यानंतर दोन वेळेस काँग्रेस उमेदवारीवर थोडक्यात पराभव स्वीकारला. 2024 ला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते पुन्हा अपक्ष लढले यात त्यांना तब्बल 56000 मते मिळाली. एक वेळेस विधान परिषद सदस्य. 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, नारायण राने, मनोहर जोशी, अशोक  चव्हाण, अजित पवार यांच्याशी घानिष्ठता, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय प्रवासात पक्षबदलाचा त्यांना फटका बसला असला तरीही त्यांचा मतदारात जादुई प्रभाव होता. 
 
परतूरला विकासाची दिशा देण्याचे मोठे कम त्यांनी केल्याने शहरासह मतदारसंघात  त्यांचा राजकीय दबदबा कायम होता. 
अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ, व सोज्वळ असल्यामुळे त्यांची लोकमनावर आगळी छाप होती. शेवटच्या क्षणापर्यंत लोकांत मिसळून राहिलेला नेता  आकस्मिक जाण्याने मतदारसंघाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जाते.
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज  पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन...
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही : सुनेत्रा पवार