लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
On
आधुनिक केसरी न्यूज
संदीप शेलार
पुणे : दि. 2 मे 2026 : लोहगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) पुणे विभागाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. मनोज मधुकर बरुटे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३९) हे जमिनीच्या व्यवसायाशी संबंधित असून, त्यांच्या विरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. या प्रकरणात मदत केल्याच्या बदल्यात तसेच भविष्यातही सहकार्य करण्यासाठी PSI बरुटे यांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत ३० एप्रिल रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी PSI ने स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी मिळून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.पडताळणीनंतर १ मे रोजी सायंकाळी लोहगाव पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना PSI बरुटे यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले तसेच पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि अविनाश घरबुडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 May 2026 20:13:11
आधुनिक केसरी न्यूज केदार शर्मा परतूर : विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया...

Comment List