ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील
आधुनिक केसरी न्यूज
फकीरचंद पाटील
पाचोरा : किशोर आप्पा पाटील बहुद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई. प्रस्तावित), पाचोरा यांच्या वतीने “ज्ञानोत्सव २०२६” या भव्य शैक्षणिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अंतुर्ली फाट्याजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे. या ज्ञानोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, सादरीकरणे तसेच मार्गदर्शनपर भाषणे आयोजित करण्यात आली आहेत. कार्यक्रमास मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील नवे दृष्टिकोन आणि आधुनिक शिक्षणपद्धती यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण होत आहे. तरी सर्व पालक, विद्यार्थी व नागरिकांनी या ज्ञानोत्सव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List