चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : दि. 03  भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या असलेल्या वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. 3) चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. या कालावधीत त्यांनी आदिवासी समाजाचे कल्याण व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामीण विकास प्रकल्प व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई