धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक
आधुनिक केसरी न्यूज
माणिक सुर्यवंशी
देगलूर : नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी युवानेते तथा 'मल्हार योद्धा' दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे देगलूर तालुक्यातील वझरगा नगरीत उत्साहात आगमन झाले.
वझरगा येथे आगमन होताच गावातील समाजबांधवांच्या वतीने दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित बैठकीत धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयीन व रस्त्यावरील लढ्याची पुढील रणनीती आखण्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला वझरगा व परिसरातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३० ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये महत्त्वाची बैठक
यावेळी दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी देगलूर व वझरगा परिसरासह जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांना नांदेड येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले.
तारीख: ३० ऑगस्ट २०२६
स्थळ: हनुमान मंदिर, विजयनगर, नांदेड
या बैठकीत आरक्षण आंदोलनाची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार असून सर्व समाजबांधवांनी ऐक्य दाखवत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी दीपकभाऊ बोऱ्हाडे (युवानेते, धनगर समाज / मल्हार योध्दा
पवन भाऊ करवर युवा नेते धनगर समाज.,
शिवकांत मैलारे (जिल्हाध्यक्ष,मल्हार सेना)
संतोष काळे (सरपंच)
हाणमंतराव बन्नाले (माजी सरपंच),प्रल्हाद नेमाने (जालना),
लबजूराव वाघमारे (अभियंता),
बालाजी काळे, विठ्ठल काळे,दीपक तुडमे
अविनाश कोकणे,सोनवणे साहेब.
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि सकल धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List