पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..!

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..!

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे : दि. २७ ऑगस्ट - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. दरम्यान घटनेच्या दिवशी पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे तात्काळ आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले होते. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर्थिक मदत कुटुंबाला देण्यात आली असून,पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार ‘शबरी आदिवासी घरकुल योजने’अंतर्गत घर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत १० लाख रुपयांची मदत आज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे देखील सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 


पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी पीडित कुटुंबाला विश्वास देत, या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निष्पाप मुलीला न्याय मिळवून देणे आणि पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना न्याय मिळेपर्यंत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

घटना घडलेल्या वस्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने आणि अखंड वीज उपलब्ध राहण्यासाठी सौर हायमास्ट बसविण्यात येतील. तसेच परिसरातील नागरिक, विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या मोक्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल,असे आश्वासन सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..! पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..!
आधुनिक केसरी न्यूज  पुणे : दि. २७ ऑगस्ट - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि...
टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघंनी रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या 
विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस