टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघंनी रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज
अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघांनी आज गुरूवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान धावत्या रेल्वेखाली झाोकून देत आत्महत्या केली . यात पतीपत्नी व दोन लहान मुलांचा समावेश आहे .या घटनेचे वञत्त कळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी सकाळी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्यासोबत दुसरीत असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेले. त्यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना या घटनेबाबत कळवले . घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील पंचनाम्यासाठी दाखल झााले . एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण अदयाप समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.या बाबत पोलिस तपास सुरू आहे . या घटनेने अमळनेर तालुका हादरला आहे .
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List