छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या

छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : २७ ऑगस्ट २०२६ छत्रपती संभाजीनगरला देशातील आघाडीचे औद्योगिक, तंत्रज्ञान आणि शिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला चालना देणाऱ्या विविध मागण्या सीएमआयए आणि सीएसएन फर्स्ट यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शहराच्या २०४७ विकासदृष्टीला गती देण्यासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिक यांच्यात समन्वयातून ठोस पावले उचलण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रितेश मिश्रा यांनी सीएसएन फर्स्टच्या माध्यमातून ‘क्लीन अँड ग्रीन सिटी’, शहर पायाभूत सुविधा, युवक व क्रीडा, शिक्षण आणि पर्यटन व शहर ब्रँडिंग या पाच प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडण्यात आली. या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरची स्वतंत्र ओळख निर्माण करून शहराला गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटनासाठी अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

शिक्षण आणि औद्योगिक विकासाला बळकटी देण्यासाठी शहरात आयआयटीची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली. सुमारे ३० हजार व्यावसायिक विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असलेले शहर, ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल उद्योगांचे अस्तित्व, स्टार्टअप्स, संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप इनक्युबेशन तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च दर्जाचे कौशल्य आणि उद्योग यांची सांगड घालण्याची मोठी क्षमता असल्याचे यावेळी मांडण्यात आले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास रॅपिड ट्रान्सपोर्ट व्यवस्था विकसित करण्याची मागणीही पुढे आली. क्रांती चौक–शेंद्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

सीएमआयएने उद्योगांच्या वाढीसाठी व्यवसाय अनुपालन प्रक्रिया सुलभ करणे, सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (PLI) योजनांचा विस्तार, औद्योगिक परवान्यांच्या प्रक्रियेला गती देणे, संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचा विस्तार, विद्यापीठ-औद्योगिक टाउनशिपची निर्मिती, जीसीसी आणि डेटा सेंटरसाठी उच्च-गती डेटा कनेक्टिव्हिटी आणि बाजारपेठा, बंदरे, विमानतळ तसेच देशातील प्रमुख भागांशी जलद जोडणी देणारा हाय-स्पीड कॉरिडॉर या प्रमुख मागण्या मांडल्या.

छत्रपती संभाजीनगरला २०४७ पर्यंत देशातील आघाडीच्या पाच औद्योगिक केंद्रांमध्ये स्थान मिळवून देणे, भारताची ईव्ही राजधानी म्हणून विकसित करणे, अजिंठा-वेरूळच्या वारशाच्या माध्यमातून प्रमुख पर्यटन केंद्र बनवणे आणि तंत्रज्ञान व शिक्षणाचे हब म्हणून विकसित करणे, अशी व्यापक विकासदृष्टी यावेळी मांडण्यात आली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी देगलूर : नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी...
छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या
अंतरवालीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जरांगे पाटील आक्रमक
संत मुक्ताईंनी लाडक्या भाऊरायासाठी जन्मभूमी आपेगावी पाठवली राखी, अलौकिक रक्षाबंधन सोहळा संपन्न
निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमीच्या जागेसाठी २९ ऑगस्ट रोजी ‘प्रतीकात्मक सरण रचून’ आमरण उपोषणाचा इशारा
पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..!
टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघंनी रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या