विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे
आधुनिक केसरी न्यूज
कुलदीप पवार
घनसावंगी : तालुक्यातील भेंडाळा येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी रंजीत पटेकर हे वारंवार गैरहजर राहत असल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहे.संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांची तत्काळ बदली करून नवीन ग्रामपंचायत अधिकारी नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गुरूवारी (ता.९) रोजी येथील गट क्रमांक २१२ मधील पाझर तलावात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले.दरम्यान,आंदोलनाची दखल घेत विस्तार अधिकारी पंचायत श्री.नागलवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सुरू असलेले जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.येत्या सोमवारी नवीन ग्रामपंचायत अधिकारी श्री .आर.आर.पवार हे रूजू होणार असल्याचे दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे.यावेळी मुकुंदा सुरासे, राहुल शिंदे, बळीराम शिंदे, निळकंठ सुरासे, शिवाजी लिहीणार, ज्ञानेश्वर सुरासे, नानाभाऊ शिंदे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List