दुसरबीडमध्ये पोलीसांचा धडक छापा ; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन जण ट्रॅक्टरसह रंगेहात!

पोलीसांची कारवाई, महसूल अधिकारी झोपेतच

दुसरबीडमध्ये पोलीसांचा धडक छापा ; अवैध वाळू वाहतूक करणारे दोन जण ट्रॅक्टरसह रंगेहात!

आधुनिक केसरी न्यूज

बाळासाहेब भोसले

सिदखेडराजा : दि.१० ऑक्टोबर किनगावराजा पोलीस ठाण्याच्या पथकाने दुसरबीड साज परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ट्रॅक्टरसह पकडण्यात रात्री ३ वाजता यश मिळवले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टर व वाळूसह एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी पोलिसांनी अर्ध्या रात्री केलेल्या कारवाईने महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर असे की फिर्यादी पोहेका ज्ञानोबा भोजाजी चमकुरे (वय ५७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजता नाईट पेट्रोलिंग दरम्यान दुसरबीड परिसरात विनानंबरचे महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली आढळून आली. तपासणीअंती सदर वाहनातून अंदाजे दीड ब्रास वाळू, किंमत सुमारे पाच हजार रुपये, अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहनासह वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणी प्रकाश भिमराव सरकटे (वय ३०) आणि दिनकर अंकुश वाहुळे (वय ४६, दोघे रा.दुसरबीड यांच्याविरुद्ध गु.र.नं. २३६/२०२५ अन्वये कलम ३०३(२) भा.दं.सं. सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज (विक्री बंदी) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोहेका विष्णु मुंढे यांनी ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, पुढील तपासही त्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. या कारवाईत प्रथमच रंगेहात पकडलेल्या चालक व मजूर सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करून दोघांना दि.९ व १० आक्टोबर या दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.यानंतर न्यायालयीन कोठडी मागीतली असता दोघांना जामीन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील तिसरा आरोपी ट्रॅक्टर मालक शेख शफी शेख तुराब हा फरार असल्याचे पोहेका शिवाजी बारगजे यांनी सांगितले. मागील वर्षभरात अवैध वाळू उत्खननाविरोधात अनेक कारवाया झाल्या असल्या, तरी या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेमुळे दुसरबीड महसूल मंडळात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचे पुन्हा एकदा वास्तव समोर आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
आधुनिक केसरी न्यूज बदनापूर : तालुक्यातील सायगाव शिवारात दुधना नदीपात्रातून काही लोकं जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन करत आहेत अशी...
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!
कार्तिक एकादशी...श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा, १ लाखांहूनअधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन