व्हिएतनामी चित्रपट सर्वोत्कृष्ट, संतोष डावखर रजत मयूर विजेता

व्हिएतनामी चित्रपट सर्वोत्कृष्ट, संतोष डावखर रजत मयूर विजेता

आधुनिक केसरी न्यूज

श्याम जैन

पणजी : "स्किन ऑफ युथ" या व्हिएतनामी चित्रपटाला आज गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या शानदार समारोप समारंभात इफ्फीचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी 'गोल्डन पीकॉक' मिळाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाच्या दिग्दर्शक अ‍ॅशले मेफेअर आणि निर्माते ट्रान थी बिश नोगॉक यांनी तो स्वीकारला. गोल्डन पीकॉक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि चाळीस लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच सिल्व्हर पीकॉक पुरस्कारासाठी 'गोंधळ' या मराठी चित्रपट दिग्दर्शक संतोष डावखर यांची निवड करण्यात आली. या समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, फेस्टीवल डायरेक्टर शेखर कपूर, माहिती व प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू, अभिनेते रजनीकांत, रणबीर कपूर, आदी उद्‌घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी होते.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ५०  वर्षाच्या गौरवशाली चित्रपट प्रवासाचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांनी बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडण्यापासून ते भारतीय पॉप संस्कृतीची पुनर्परिभाषा करण्यापर्यंत अभूतपूर्व कामगिरी केली. याच समारंभात नवाजुद्दीन सिद्दकी, किरण व्ही. शांताराम व इतर कलावंताचा सत्कार करण्यात आला. 

 १९५२ मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरू झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा(ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने २००४ पासून दरवर्षी गोव्यात होतो. तत्पूर्वी तो विविध शहरांमध्ये होत असे.

यंदा फेस्टिवल चे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने झाले.  कार्निव्हल परेडच्या माध्यमातून गोवा सरकारच्या चित्ररथांसह दोन डझनहून अधिक चित्ररथांनी भारताचा सिनेमॅटिक वारसा, अ‍ॅनिमेशनचे जग आणि प्रादेशिक संस्कृतींच्या समृद्ध विविधतेचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय संचार ब्युरो आणि एनएफडीसीने ५० व्या वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून सादर केलेला 'भारत एक सूर' हा भव्य लोककला कार्यक्रम होता. गॅब्रिएल मस्कारोची डिस्टोपियन कथा 'द ब्लू ट्रेल' या चित्रपटाने ५६ व्या इफ्फीचे उद्घाटन झाले होते. तर ऑलिव्हर लॅक्स दिग्दर्शित 'सिरत' हा 'मिड फेस्ट' चित्रपट होता. तसेच ' अ यूजफूल गेस्ट' या थाई भाषेतील चित्रपटाने फिल्म फेस्टिवल चा समारोप झाला. 

 इफ्फीला खऱ्या अर्थाने वेगळे स्वरूप देणारे घटक म्हणजे  मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी सिनेमाप्रेमींची मांदियाळी येथे एकत्र येत असते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका