निधी आभावी रखडलेला एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत हप्ता त्यांच्या खात्यात जमा ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  दिलेले आश्वासन पाळले

निधी आभावी रखडलेला एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत हप्ता त्यांच्या खात्यात जमा ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  दिलेले आश्वासन पाळले

आधुनिक केसरी न्यूज 

रत्नपाल जाधव 

मुंबई : २५ फेब्रुवारी :-  सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या  वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात अखेर जमा झाला. होळी पुर्वी पैसे जमा केले जातील हे कर्मचाऱ्यांना   दिलेले आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाळलेले आहे.ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.काही संघटनांनी चक्का जामची घोषणा ही केली होती . १० वी व १२ वीच्या परिक्षा ,येणारा होळी सण यावर या आंदोलनाचा परिणाम होउ शकतो याचे गांंभिर्य ओळखुन मंत्री महोदयांनी तातडीने मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले व उर्वरित थकबाकी मिळताना  याची पुनरावृत्ती होउ नये या अपेक्षा ही  व्यक्त केल्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या...
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना