वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज

वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज

आधुनिक केसरी न्यूज 

वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास दहा ते बारा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत 10 करोड रुपये आहे नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी चारच्या सुमारास जिनिंगला लागलेली ही आग विझवण्यासाठी विविध ठिकाणांचे आठ बंब प्रयत्न करत असतानाही वृत्त लिहीस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती.

आग लागल्याचे वृत्त कळताच प्रशासन खडबडून जागी झाले.  तहसीलदार योगेश कौटकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल,पोलीस निरीक्षक सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह त्वरने  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली. ही आग विझवण्यासाठी वणी, वरोडा, भद्रावती नगरपरिषदेचे तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती, जीएमआर, साई वर्धा, डब्लू सी एल आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु चार तास झाले असतानाही आग विझवण्यात यश आले नव्हते. या आगीत जिनिंग मधील कापूस हलविण्यासाठी उपयोगात येणारे एक वाहन जळून खाक झाले.

आग विझवण्याचा महिलेचा केविलवाणा प्रयत्न
जिनिंग मध्ये कर्मचाऱ्यांच्या चहापानाची व्यवस्था करणारी गिताबाई नामक महिला कर्मचारी मात्र लागलेली ही प्रचंड आग बादलीने विझवण्याचा केविलवाणा  प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. गेले दोन दिवस जिनींग मागील कामकाज बंद होते. त्यामुळे आगीचे कारण समजू शकले नाही. या सुट्टीत जिनींग मध्ये काही काम केल्या जात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात परिसरात ऐकावयास मिळाली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई