लग्नाला जात असताना भीषण अपघात : बहीन,भाऊ जागीच ठार

लग्नाला जात असताना भीषण अपघात : बहीन,भाऊ जागीच ठार

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ११ एप्रिल सायं. अंदाजे ६:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर अरुण शहारे (वय-१८ रा.देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय-१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) असे मृत बहीण भावाचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५० रा. देवरी) असे जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्याला होते. आणि रितिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. वडील कोरोना काळामध्ये वारल्यामुळे घरची जबाबदारी ही आई अरुणा हिच्या अंगावर होती.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे आज त्यांचे नातलगाचे लग्न सभारंभाचे कार्यक्रम असल्या कारणामुळे ते आपल्या तिघेही दुचाकीवरून देवरी वरून बोळदे येथे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास अर्जुनी/मोर तालुक्यातील नवेगाव/बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. या भीषण अपघातात अंकुर तसेच त्याची बहीण रितिका यांच्या शरीरावरून वाहन गेल्याने त्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर आई अरुणा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई