मंगळवेढ्यात नरबळीचा प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण मिळाला
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असून, त्यासाठी कर्नाटकातील विजयपूर येथून मांत्रिक बोलावला गेला होता. हा सगळा प्रकार म्हणजे नरबळीचा प्रकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मंगळवेढ्यात नरबळीचा प्लॅन ठरलेला ? यासाठी १० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. , इतकेच नाही तर या कामासाठी बाहेरील मांत्रिक देखील आणण्यात आला होता. यावेळी नशेत तरर असलेला एक तरुण या खोल खड्याजवळ आढळून आला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका घरात ही अघोरी पूजा केली जात होती. यासाठी एका तरुणाच्या 'नरबळी'चा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दिनेश वेदपाठक या तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा भाऊ दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला दारू पाजून नशेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अघोरी पूजेसाठी आणि नरबळी देण्यासाठी कर्नाटकातील विजापुर जिल्ह्यातील कही मांत्रिक देखील बोलावण्यात आले होते
ज्या घरात अघोरी पूजा मांडण्यात आली होती, त्याच घरात सुमारे १० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.. खड्याच्या बाजुला तिथेच अघोरी पूजा मांडण्यात आली होती.. या पूजेसाठी कर्नाटकातील विजापूर येथून मांत्रिक बोलावण्यात आले होते असे उघड झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलिसांनी 'नरबळी'चा प्रकार असल्याचे संशय व्यक्त केला असून , सदर प्रकरण अंधश्रद्धेशी संबंधित पूजेचा भाग आहे, असे म्हटले आहे तर स्थानिकांनी मात्र हा नरबळी देण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
घटनेबद्दल उपस्थित झालेले प्रश्न?
या घटनेनंतर काही प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. १० फूट खोल खड्डा नेमका कशासाठी खोदण्यात आला होता? बाहेरील मांत्रिकाला का बोलावण्यात आले होते?, संबंधित तरुणाला नशेत ठेवण्यामागील उद्देश काय होता ? अशी चर्चा होत आहे.
"घटनास्थळी आम्ही स्वतः भेट देऊन पाहणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार नरबळीशी संबंधित असून काही विधी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, कोणताही गैरप्रकार घडलेला नाही, नरबळीची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे", असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List