पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रवीण उर्फ श्याम अशोक देवरे हिम्मतनगर मालेगाव कॅम्प याच्यावर गुन्हा दाखल

पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

आधुनिक केसरी न्यूज 

मालेगाव : कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम व कीटकनाशक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण श्री शुभम नाझीरकर यांचे संयुक्त पथकाने कारवाई करत 5 लाख 47 हजार रुपयांचा अनधिकृत कीटकनाशकांचा साठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई मा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक श्री सुभाष काटकर मा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री कल्याण पाटील व तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या उपस्थितीत कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव येथे करण्यात आली. दिनांक 28 मार्च रोजी हिम्मतनगर परिसरातील सार्वजनिक शेडमध्ये दुपारच्या वेळी अनधिकृत साठा असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाल्यानंतर कृषी विभाग व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक सदर ठिकाणी दाखल होऊन पडताळणी केली असता श्री प्रवीण अशोक देवरे वय 40 राहणार हिम्मतनगर गल्ली नंबर एक याने अनधिकृत पणे कुठलाही कीटकनाशक परवाना नसताना तीन लाख 80 हजार किमतीचे 1900 किलो वजनाचे फोरेट10% ग्रॅन्युलर  चे एक किलो पॅकिंगचे 38 ड्रम व 40 हजार रुपये किमतीचे 250 किलो वजनाचे क्लोरोपायरीफॉस 10% ग्रॅन्युलर लिथल 5 किलो पॅकिंगचे प्रत्येकी 50 किलोचे पाच ड्रम तसेच 78 हजार रुपये किमतीचे 300 किलो वजनाचे फोरेट 10% ग्रॅन्युलर पॅनटॉन एक किलो पॅकिंगचे प्रत्येकी 50 किलो वजनाचे सहा ड्रम त्याचबरोबर  49 हजार किमतीच्या 700 किलो वजनाच्या कीटकनाशकात फेनवलरेट 0.4% डीपी पाच किलो पॅकिंगच्या प्रत्येकी 50 किलोच्या 14 गोण्या आढळून आल्या असून सदर जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5 लाख 47 हजार रुपये आढळून आली. सदरील जप्त केलेल्या मुद्देमालाच्या प्रत्येक कीटकनाशकाचे नमुने काढून कीटकनाशक परीक्षण प्रयोगशाळा औरंगाबाद येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदर जप्त मुद्देमालात उत्पादन, साठवणूक, विक्री व वापर यावर बंदी असलेले 300 किलो फोरेट 10% ग्रॅन्यूलर पॅनटॉन  व 1900 किलो फोरेट 10% ग्रॅन्यूलर थायमेट 10 जी आढळून आल्याने आरोपी शाम देवरे याच्यावर रात्री उशिरा गुन्हा क्रमांक 0046 दि. 29/03/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपी प्रवीण अशोक देवरे याच्यावर कीटकनाशक अधिनियम 1968 च्या कलम 29, पर्यावरण संरक्षण अधिनियम1986 कलम 15(1),कीटकनाशके नियम1971 च्या कलम 6,9,10,15,16,17,18,19,37,38,39,40,41,42,43,44 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तरि कोणीही विना परवाना उत्पादन साठवणूक विपणन व विक्री केल्याचे आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे विना पावती विक्री करणाऱ्या फिरते विक्रेत्यांकडून कोणतेही कीटकनाशक खते वा बियाणे खरेदी करू नये तसेच अशी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क करून तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कारवाई वेळी तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम, तालुका कीटकनाशक निरीक्षक शुभम नाझीरकर, मंडळ कृषी अधिकारी दाभाडी सुरज गावडे, पंचायत समिती कृषी अधिकारी भीष्मा पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील इ रात्री उशिरापर्यंत  गुन्हा दाखल करणे कामी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  मालेगाव : कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम व कीटकनाशक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गुणवत्ता...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून