नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 

दोषींवर कारवाई करण्यात यावी परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : येथे २७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या बीएड व सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ उडाला असून सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेली परिक्षा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आहे. सदरील परिक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक परिक्षा आयुक्तांनी कळविले आहे. दरम्यान सदरील परिक्षा रद्द करण्यात यावी व परिक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. नांदेड तालुक्यातील बोंढार परिसरातील गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मराठवाडा ऑनलाइन परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात बीएड व सीएटी परिक्षा घेण्यात येणार होती. सदर परिक्षा केंद्रावर ४३० विद्यार्थी परिक्षा देणार होते. प्रशासनाच्या गैरव्यवस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने शैक्षणिक नुकसान झाले होते. बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणारी ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा सकाळपासूनच अडचणीत सापडली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र केंद्रावर पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती.  तर काहींना तासन्तास उभे राहून प्रतीक्षा करावी लागली. परीक्षा केंद्रावर संगणकांची संख्या अपुरी होती. नियोजित विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी संगणक उपलब्ध असल्यामुळे अनेकांना लॉगिनच करता आले नाही. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू केली असताना इंटरनेट सेवा अचानक बंद पडली. परिणामी अर्धा पेपर सोडविल्यानंतर परीक्षा प्रणाली बंद झाली आणि विद्यार्थ्यांचे उत्तरपत्र सादर होऊ शकले नाही.

गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या इक्बाल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन बीएड प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे परीक्षेला मुकावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी विद्यार्थ्यांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परीक्षा पुन्हा घ्यावी, विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढावे अशा मागण्या करत विद्यार्थ्यांनी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. काही पालकांनीही केंद्राबाहेर उपस्थित राहून प्रशासनाकडे निषेध नोंदवला.परीक्षा केंद्राची पूर्वतपासणी न करता मंजुरी देण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की काहींना परीक्षा सुरूच करता आली नाही, तर काहींना अर्ध्यावरच परीक्षा थांबवावी लागली. यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. ऑनलाइन परीक्षांसाठी स्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पुरेशी संगणक सुविधा व नियोजनबद्ध बैठक व्यवस्था आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराची दखल घेऊन संबंधित परीक्षा प्राधिकरणाने तातडीने चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी परिक्षार्थी विद्यार्थी करत आहेत.

बीएड व सीएटी परिक्षा पुढे ढकलली
नांदेड येथील सकाळच्या सत्रात बीएड व सीएटी परिक्षेत झालेल्या गडबड घोटाळ्याची राज्य सामाईक परिक्षा आयुक्तांनी गंभीर दखल घेत २७ मार्च रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परिक्षा तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सदरील परिक्षा २८ किवा २९ मार्च रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. त्यामुळे २७ मार्च रोजी परिक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा आपले हाॅल तिकिट काढून घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. परिक्षेचा दिनांक पुन्हा एस एम एस किंवा ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज     छत्रपती संभाजीनगर : दि.२७ जिमका जिल्ह्यात येणारा पेट्रोल डिजेलचा साठा हा पूर्वी इतकाच किंबहुना थोडा जास्तच आहे....
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 
नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 
राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!
गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 
चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण
टू व्हीलर ला आग; तीवडीचे माजी पोलीस पाटील थोडक्यात बचावले.