गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 

सोलापूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या गुलबर्गा जिल्ह्यात असलेल्या श्री क्षेत्र 

गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 

आधुनिक केसरी न्यूज 

महेश गायकवाड 

सोलापूर : गाणगापूर ला  देव दर्शनासाठी जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात अफजलपूर येथे तिचा खून केला ही घटना अफजलपूर तालुक्यात घडली आहे  पत्नीसोबत कारमध्ये वाद झाले, आणि नंतर पत्नी स बाहेर ओढून तीच्या अंगावर कार चढवून तिचा खून केला आहे.

 आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर जवळ घडला आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार आरोपी पतीने आधी आपल्या पत्नीला एसयूव्हीमधून बाहेर ढकललं आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे.

अक्षय आणि शैला यांचं लग्न होऊन चार वर्ष झाली होती आणि हे दोघंही मूळचे बारामतीचे होते, अशी माहिती कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलू यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार शैलाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अक्षयला होता आणि या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी आरोपी पती अक्षय याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.

पतीने चिरला पत्नीचा गळा

दुसरीकडे कर्नाटकाच्याच कलबुर्गीमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील बल्लुर्गी गावाजवळ घडली, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली. आरोपी पतीने पत्नीला जबरदस्ती गाडीतून आणलं आणि तिला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं, यानंतर त्याने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रकांत पतरंगे गडचिरोली : जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर...
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 
नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली 
राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!
गोंदियात ४५ नर्सिंगच्या विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा  - शासकीय नर्सिंग कॉलेजमधील घटना : सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू 
चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण