वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय प्रज्वलचा मृत्यू 

अर्जुनी मोर तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श येथील घटना 

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय प्रज्वलचा मृत्यू 

आधुनिक केसरी न्यूज 

 गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श येथे आज दिनांक 10 एप्रिल रात्री आठ वाजताच्या सुमारास अत्यंत धक्कादायक दुर्दैवी घटना घडली प्रज्वल गोवर्धन मेश्राम वय वर्ष सहा राहणार धाबे टेकडी आदर्श हा चिमुकला लघवी करिता घराच्या बाहेर निघताच दबा धरून बसलेल्या वाघाने क्षणार्धात प्रज्वला उचलून जवळच्या जंगलाच्या दिशेने नेले लगेच घरच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी मोठ्याने आरडाओरड करत गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली असता घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला मात्र या हल्ल्यात प्रज्वल चा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट ऊसळत आहे आणि वनविभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये 11 एप्रिल...
वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय प्रज्वलचा मृत्यू 
पोटच्या मुलानेच केला वडिलाचा खून ; रुई येथील हत्याकांडाचा २ तासांत छडा
लातूरनजिक कार अपघातात; केजचे तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू
Breking News : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार : हर्षवर्धन सपकाळ 
पाचोर्‍यात दर्जेदार रस्त्यांची सुरुवात; प्रभाग ९ मध्ये भव्य भूमिपूजन
हिमायतनगर शहरात दोन गटात हाणामारी; एकमेकांवर तलवारी व  चाकूने हल्ला