भोकर येथील तत्कालीन अभियंत्यास एक वर्षाची शिक्षा
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : वर्गखोली बांधकामाच्या निधीतील शिल्लक रक्कमेचा धनादेश देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या भोकर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील तत्कालीन अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांना एक वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी बुधवारी (ता ८) सुनावली आहे. न्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,ताटकळवाडी (ता भोकर)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत एका खोलीचे बांधकाम करिता २०१३मध्ये ३,८०,०००/- रुपये मंजूर झाले. त्यानंतर सदर बांधकामातील १८९००/ रुपयांच्या शिल्लक धनादेश देण्यासाठी आरोपी लोकसेवक अभियंता तुकाराम चौतमल यांनी तक्रारदार यांच्याकडे ५०००रुपयाच्या लाचेची मागणी केली. केलेल्या तक्रारीनंतर लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोड अंती २५००रुपये लाचेची रक्कम मागणी करून स्वतः १५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली होती.याप्रकरणी मुख्याध्यापक अशोक गंगाधर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक भीमराव शिंगाडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. लाच घेतल्याप्रकरणी आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वये १ वर्षे सक्तमजुरी कारावास व ५००० रुपये. (१)(डि) कलमा अन्वये १ वर्षे सक्तमजुरी कारावास व ५००० रुपये दंड अशी शिक्षा सुनवली आहे. असे १वर्ष सक्तमजुरी कारावास व १०००० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू ॲड.अनुराधा डावखरे यांनी मांडली.त्यांना पोलीस काॅंस्टेबल वैशाली पुंडे,पो.ह.बाबुराव सावळे यांनी सहकार्य केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List