नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 

नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरात खुनाची मालिका सुरूच असून तिसऱ्या दिवशी एका शिवसेनेच्या युवा नेत्यांच्या खुनामुळे खळबळ माजली असून शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. सलग तीन दिवसांत पाच खुन झाल्यामुळे पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत. दरम्यान पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी यांची बैठक घेऊन कान उघडणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्व गल्ली बोळात गावठी पिस्तूल व धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांनी हैदोस घातला आहे. गुंडाच्या टोळयात वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. तीन दिवसांपूर्वी काॅनल रोड परिसरातील डि मार्ट जवळ मध्यरात्री सदा गँग व साईलाला यांच्या गँग मध्ये टोळी युद्ध झाले असून यात अर्जितसिंग चव्हाण व सय्यद अवेज, महंमद अरबाज यांच्यात जुन्या वादातून तलवार व खंजीराने हाणामारी होऊन तीन जणांचा खुन करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर प्रकरणात दोन्ही गँग विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूंच्या ८ जणांना अटक केली आहे. 

शहरातील मुरमुरा गल्ली येथील रजुसिंग उर्फ रणजितसिंग यांचा ४ मार्च रोजी रात्री खुन करण्यात आला आहे. वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी तात्काळ या खुनातील आरोपी प्रेमज्योतसिंग परविंदसिंग कांचवाले यांच्यासह एका अटक केली आहे. 
नांदेड शहरातील श्रीनगर येथे ६ मार्च पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी शिवसेनेचे युवा नेते सोनू कल्याणकर यांच्यावर कुमार दुकानाशेजारी तीन ते चार जणांनी खंजीराने सपासप वार करुन सोनू कल्याणकर यांचा खुन केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी खुन करुन पळून गेले आहेत. दरम्यान सदरील घडली सकाळी घडली असून फिरणाऱ्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोर पळून गेले आहेत. खुनाची घटना समजताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे हे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सदरील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणांत एका संशयितांला ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही जुन्या वादातून घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसात पाच खुन झाल्यामुळे पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. तसेच या बैठकीत वरिष्ठ अधिकारी यांची कान उघडणी केली होती. दरम्यान सर्व दररोज घडत असलेल्या खुन प्रकरणामुळे गुन्हेगारी किती बोकाळली यांचा प्रत्यय येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण  नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरात खुनाची मालिका सुरूच असून तिसऱ्या दिवशी एका शिवसेनेच्या युवा नेत्यांच्या खुनामुळे खळबळ माजली असून...
मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन