हिमायतनगर शहरात दोन गटात हाणामारी; एकमेकांवर तलवारी व  चाकूने हल्ला

हिमायतनगर शहरात दोन गटात हाणामारी; एकमेकांवर तलवारी व  चाकूने हल्ला

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : हिमायतनगर येथे राजकीय वैमनस्यातून दोन गटांमध्ये आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसाढवळ्या धारदार शस्त्रांनी दोन गटात जीवघेणा हल्ला झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सदर घटनेमुळे हिमायतनगर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना तालुका हिमायतनगर येथील बाजारपेठेतील उमर चौकात घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने अचानक उग्र रूप धारण केले. दोन गट आमने सामने येऊन तलवारी, चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमींपैकी शेख रईस व शेख कलीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर शेख शाकीर यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हातावर शस्त्राचे टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक 15 चे काँग्रेस  नगरसेवक शेख इलियास यांच्यासह शेख अफरोज, शेख फिरोज, शेख इमरान, शेख इजाज, शेख जावेद, शेख मेहमूद तहारी यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर घटनेमुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पाचोर्‍यात दर्जेदार रस्त्यांची सुरुवात; प्रभाग ९ मध्ये भव्य भूमिपूजन पाचोर्‍यात दर्जेदार रस्त्यांची सुरुवात; प्रभाग ९ मध्ये भव्य भूमिपूजन
आधुनिक केसरी न्यूज  फकिरचंद पाटील पाचोरा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत पाचोरा शहरातील रस्ते विकासाला नवे बळ...
हिमायतनगर शहरात दोन गटात हाणामारी; एकमेकांवर तलवारी व  चाकूने हल्ला
भोकर येथील तत्कालीन अभियंत्यास एक वर्षाची शिक्षा
दै. आधुनिक केसरीच्या वृत्ताची शासनाकडून दखल; नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख निलंबित
सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक
नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच, पोलिसांच्या इभ्रतीचे धिंडवडे; शहरातील नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण 
मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला