लातूरनजिक कार अपघातात; केजचे तहसीलदार गिड्डे यांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
लातूर : केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आश्चर्य म्हणजे अपघात नेमका केंव्हा झाला ते केजकडून येत होते की जात होते. ते खासगी गाडीने का निघाले ते एकटेच गाडीत होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी २०२१ मध्ये माहूर येथे तहसीलदार तसेच नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे जनमानसात त्यांची वेगळी ओळख होती. गुरूवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास लातूर ते रेणापूर रोज सायकलिंग करणारे 'लातूर सायकलींग क्लब'चे सायकलपटू हे अपघात प्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणापूर नजिकच्या वळणावरून जात असताना दोघा सायकलपटूंना रस्त्याच्या कडेला कार पलटी झालेली दिसली. त्यांनी तात्काळ आपतकालीन क्रमांक १०८ ला फोन करून निरोप दिला. आपातकालीन पथक तात्काळ आले पण तहसीलदार राकेश गिड्डे हे मृतावस्थेत आढळले. ते केज, (जि. बीड) येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. ते मुळचे सांगली जिल्ह्यातील बेडक, (ता. मिरज) येथील रहिवासी होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List