चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर, दि.11 : राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरून तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथून प्राप्त माहितीनुसार  11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी नोंदविण्यात आली. याचा केंद्रबिंदु चंद्रपूर जिल्ह्यातील  हार्दोना (ता. राजुरा) गावाजवळ असल्याचे कळते. सदर धक्का हा अती सौम्य प्रकारचा आहे . या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही. याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी  केले आहे.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. तसेच नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल, अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना  पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या...
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता