संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार

संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, भारतीय संगीत विश्वासाठी ही एक अतुलनीय हानी आहे. आपल्या विलक्षण, सुमधुर आवाजाच्या जोरावर त्यांनी गेल्या आठ दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीने केवळ हिंदीच नव्हे, तर विविध भारतीय भाषांतील संगीताला समृद्ध केले आणि भारतीय संगीताचा गोडवा जगभर पोहोचवला. त्यांच्या जाण्याने आज अजरामर सुरांचा सुरेल प्रवास आणि संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.

     आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गात संगीतसृष्टीला अनमोल ठेवा दिला. त्यांच्या प्रत्येक गाण्यात भाव, अभिव्यक्ती आणि सुरेलपणाची अद्वितीय सांगड दिसून येत असे. शास्त्रीय, सुगम संगीत, गझल, लोकसंगीत, चित्रपट गीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावनिक तरलता यामुळे त्यांच्या गीतांना आजही तितकीच लोकप्रियता आहे.
त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, नवोदित कलाकारांसाठी त्या सदैव आदर्श राहिल्या आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ महानच नव्हे, तर अजरामर आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि श्री माता महाकाली त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोक संदेशातून केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना  पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या...
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता