मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट

मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट

आधुनिक केसरी न्यूज 

मंठा : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून  कारवाई करण्यात आली.
धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू नष्ट करण्यात आली.याप्रकरणी अविनाश भगवान गायकवाड राहणार मंठा बीके कॉर्नर इंदिरानगर विनायक नारायण इंगोले राहणार मंठा या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, फौजदार संतोष माळगे, विठ्ठल केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी आनंद ढवळे, मंगेश चौरे, सतीश आमटे, शिवानंद काळुसे, संतोष बनकर, मुंजा कोलगणे, जगन्नाथ सुक्रे आणि महिला पोलीस कर्मचारी सुला मरकड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
मंठा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई