धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा

वाशी पोलिसांकडून अफूच्या कारवाई; ५८ किलो ओला अफू जप्त, तिघांना बेड्या!

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा

आधुनिक केसरी न्यूज 

धाराशिव : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईट उपक्षेत्रांतर्गत मौजे पाखरुड शिवारात अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे ८ लाख ७७ हजार रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीवरून रचला सापळा
पाखरुड शिवारात अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या 'अफू'ची बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीलायक माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

मोठ्या फौजफाट्यासह धाडसी कारवाई
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, घोडके, आणि पोलीस उपनिरीक्षक भाळे यांच्यासह अंमलदार बोरकर, मलंगनेर, लाटे, खैरे, खारगे, मिसाळ, कोरडे, आणि चौघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी शासकीय पंच, कार्यकारी दंडाधिकारी, वजन मापे संचालक, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते.
जप्त केलेला मुद्देमाल:
छाप्यादरम्यान खालीलप्रमाणे अफूची झाडे जप्त करण्यात आली:
 * अशोक चव्हाण (गट क्र. ८): ३६ किलो अफूची झाडे (किंमत ₹५,४०,०००/-)
 * राजेंद्र चव्हाण (गट क्र. १२): १८ किलो अफूची झाडे (किंमत ₹२,७०,०००/-)
 * धोंडिबा चव्हाण: ४.५ किलो अफूची झाडे (किंमत ₹६७,०००/-)
जागेवरच पंचनामा आणि अटकेची कारवाई
फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत सर्व मालाचे वजन करून, व्हिडिओ चित्रीकरणासह कायदेशीर जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाशी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव  सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील परसराम तांडा येथे सोलार लाईटच्या खांबावर शाॅट सर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली...
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट