सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
म्हसवड : सातारा जिल्ह्यातील विकासनगर परिसरात प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा अवघ्या १२ दिवसांत झालेला संशयास्पद मृत्यू हा अत्यंत गंभीर व चिंताजनक प्रकार असून या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मृत तरुणी भाग्यश्री संजय मोटे (वय २१) हिने दि. ३० मार्च २०२६ रोजी राजकुमार कांबळे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही दिवसांतच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले. मुलीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सासरच्या मंडळींकडून ५ लाख रुपये व ५ तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. सदर मागणी पूर्ण न केल्याने तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. १२ एप्रिल रोजी रात्री संबंधित तरुणीला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती देण्यात आली; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूमागील कारणांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पती, सासू व इतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी तातडीने व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List