तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट
रिसोड: वाशिम जिल्ह्यात जून पासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हातचे सर्व पिक गेले, त्यांमुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी साठी पाण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची रब्बी पिंकावर मदार आहे. मात्र आता महावितरणच्या ठिसाळ नियोजनामुळे करडा फिडरची थ्री पेज लाईट तास भर टिकत नसल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.
करडा, खडकी सदार, तादळवाडी या गावातील शेतकऱ्यांची पिके लाईट अभावी जमिनी
च्या बाहेर डोके काढत नाहीत. ज्या शेतकऱ्यांने रब्बीची सुरुवातीला लवकर पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांची पिके सध्या तरी बरी आहेत मात्र लाईट अभावी ही सर्व पिके कोमजून जात आहे. करडा फिडरवर मागील तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात लोड वाढला आहे. त्यामुळे येथील लाईट व्यवस्थीत चालत नसल्याने यांचा शेतकऱ्यांना यांच्या मोठा फटका बसत आहे. आधीच अतिवृष्टीने कबरडे मोडले आणि आता महावितणच्या ढिसाळ कारभारमुळे पुन्हा एकदा या चार ते पाच गावातील शेतकरी संकटात सापडला आहे.
लोकप्रतिनिधी निवडणुकामध्ये मगशुल; शेतकरी मात्र वाऱ्यावर
मागील चार ते पाच वर्षापासून करड फिडर वरील गावाना हिवाळी सिजन चालू झाले की, लाईट अभावी अर्धे पिक वाळून जाते, पर्यांने उत्पनात घट होते. याकडे तालुक्यातील कुठल्याच लोकप्रतीनीधीनी लक्ष घातले नाही. अशी तक्रार आता शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे.
सचिन सदार ( तंटामुक्ती अध्यक्ष खडकी सदार )
करडा फिडरवर मागील तीन चार वर्षापासून सिजन चालू झाल्यानंतर हा लोड वाढत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकडे लोकप्रतिनीधी वेळीची लक्ष दिले असते तर आज शेतकऱ्यांवर ही वेळी अलीच नसती, त्यामुळे हा लोड कशा कमी करता येईल यावर महावितरण सोबत चर्चा करुन शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर काढावे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List