नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : राज्यात होत असलेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आजच्या निकालानुसार मतदान जरी आज होत असले तरी मतमोजणी मात्र पुढे ढकलण्यात आलेली आहे आता ही मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होईल नागपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयावर सर्वत्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली अत्यंत तिखट प्रतिक्रिया समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
आज नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे, राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झाला आहे.राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे सरकारला दाखवायचे होते, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला गेली.
निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. राज्यात इतक्या निवडणुका झाल्या पण याआधी असे कधीच झाले नव्हते.यासाठी फडणवीस सरकार जबाबदार आहे, मतमोजणीत अडथळा येणे म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैश्याचा वापर करणं, खरंतर हा मत चोरीचा तर प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. अशा तिखट शब्दात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List