खुनाच्या गुन्हातील तिघांना १२ तासाच्या आत अटक मोखाडा पोलिस ठाणे यांची कारवाई..!

खुनाच्या गुन्हातील तिघांना १२ तासाच्या आत अटक मोखाडा पोलिस ठाणे यांची कारवाई..!

आधुनिक केसरी न्यूज

तेजस रोकडे 

मोखाडा : तालुक्यातील सातुर्ली गावात किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना घडली असून यातील तीनही दोषींना बारा तासांच्या आत अटक करण्यात मोखाडा पोलिसांना यश आले आहे.नवसू लाडक्या फुपाने (५५) रा. सातुर्ली, यांनी त्याच गावातील काही तरुणांना त्यांच्या शेतालगत असलेल्या नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारू नका असे सांगितल्याने त्याचा राग मनामध्ये धरून आरोपी जितेंद्र जयराम पाटील (३१) रितेश तुकाराम पाटील (२३) प्रमोद चिंतामण वारघडे ( २५) यांनी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी फुपाने याच्या शेतावरील घरी जाऊन शिवीगाळ व दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण केली ठार केल्याची फिर्याद मृत नवसू फुफाणे यांचा मुलगा सोमनाथ फुफाणे यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दिली . याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू होता.

यानंतर तीनही आरोपी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र मोखाडा पोलीस ठाण्याची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आणि घटनेच्या बारा तासांच्या आत या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. अगदी किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याने मोखाडा परिसरात भीतीचे वातावरण असून कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!