कटगुण गावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून
आधुनिक केसरी न्यूज
नितीन राजे
सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण गावात शनिवारी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून झालेल्या खुनात बबलू मनोहर जावळे (वय 40) रा.कटगुन याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना कटगुण गावाच्या पूर्वेस धारपुडी रोडवरील म्हारकी शिवारात घडली. घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी तात्काळ भेट दिली असून, तपास सुरू आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बबलू जावळे आणि दीपक जावळे यांच्यात काही दिवसांपासून पूर्ववैमनस्य होते.वाद वाढताच दीपक वामन जावळे याने बबलू मनोहर जावळे याच्या घरासमोर जाऊन त्याच्या डोक्यात भरीव कळकाचे दांडके मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा जागीच खून केला.
यानंतर संशयित आरोपी दीपक जावळे स्वतःच जखमी अवस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. त्याच्या जखमा पाहून डॉक्टरांनी पुसेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्याचवेळी गावच्या पोलीस पाटील जयश्री गोरे यांनी देखील पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाणेचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, दिपक बर्गे, चंद्रहार खाडे, पोलिस हवालदार योगेश बागल, तात्या ढोले,विपुल भोसले, अशोक सरक,नेहा कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल दर्याबा नरळे, बापूराव नवत्रे, जायकर जायकर,अमृता चव्हाण , प्रणिता वाघ यांनी तसेच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथक, ठसेतज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले.गेल्या काही आठवड्यांपूर्वीच कटगुण गावात एका भंगार व्यावसायिकाने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List