मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन 

मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन 

आधुनिक केसरी न्यूज

पैठण : आरोग्य शिक्षण आणि रोजगार या तिन्हीच्या संधी शहरात तयार होतात आणि म्हणून चांगली केली तर गरीब आणि मध्यमवर्गीय जीवनमान बदलेल अधिक संधी तयार होतील अधिक रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि समाज या ठिकाणी वर येईल आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहरा करता योजना तयार केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी हर घर जल योजना शहरी अशा अनेक योजना तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता दिले.
 शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था दिली पाहिजे म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना दिली या योजनेत मग घरकुल हे गरिबांना आणि बेघरांना दिले पाहिजे असा आपल्याला सांगितलं त्यामुळे पैठणच्या नगराध्यक्षा म्हणून मोहीणी लोळगे यांना निवडून द्या आम्ही पैठण शहराकरीता २००० हजार घरकुले देवु, तसेच लाडक्या बहीणी ला लखपती दिदी बनवण्याचे अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कैले.
त्याच दरम्यान दुसरीकडे दुपारी  शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या विकासासाठी नगर परीषदेच्या सर्वच उमेदवार तथा नगराध्यक्षा पदासाठी उभे असलेल्या विद्या भुषण कावसानकर यांना निवडुन देण्याचे अवाहन करून जे वोक अतिक्रमण करून राहतात आणि त्या अतिक्रमणामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही दोन महिन्यापूर्वी आपण शासन निर्णय केला आणि आता पैठण सारख्या शहरांमध्ये जे लोक अतिक्रमण करून राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा पण देणार आहोत आणि त्यासोबत अडीच लाख रुपये  घरासाठी देवु. ज्ञानेश्वर उद्यान नंतरच्या काळात त्याची परिस्थिती काय झाली तर पुन्हा एकदा आपल्या सरकारने दिटशे कोटी रुपये त्या उद्यानाकरता दिलेले आहेत आणि हे उद्या हे प्रमुख आकर्षणाचा स्थळ करून या ठिकाणी जे भाविक येतात त्या भाविकांना त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद देखील मिळाला पाहिजे.
यावेळी पैठण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही आपल्या पक्षाच्या निवडूक प्रचारासाठी आले होते. दोघांनी ही मीच तुमचा लाडका भाऊ अशी साद घातली आणी आता लाडकी बहीणीला लखपती करण्याचे अश्वासन देवुन गेले. यावेळी मंत्री आतुल सावे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे तसेच शिवसेनेच्या ठिकाणी खा. संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, नंदलाल काळे, शहादेव लोहारे, नाथ विस्वस्त दादा बारे, प्रशांत जगदाळे याच्यासह दोन्ही सभेला हजारो महीला नागरीकांची गर्दी होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे  किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मंगळवारी (ता.2) होणारी निवडणूक मुक्त आणि निःपक्षपातीपणे...
मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन 
गाडगे बाबा चौकात फिल्मी स्टाईल दरोडा ; चाकूचा धाक,२० लाखांचा ऐवज लंपास
गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती
घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती
न.प निवडणूकीत आता २० डिसेंबर रोजी मतदान नि.आयोगाच्या आदेशानंतर निवडणूक प्रचाराला विश्रांती 
ही निवडणूक  वरोड्याच्या  विकासाची,लाडकी बहीण योजना बंद न करता अधिक मजबूत होणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन..!