मतदारांची ओवाळणी कुणाला लाभदायी ठरणार..?
भोकरचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी ईच्छुकाची संख्या वाढली
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : मागील पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.आता लवकरच निवडणूकीचा "नगारा" पिटणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कान टवकारले आहेत. इच्छूक उमेदवारांची संख्या वाढली असून वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे.मतदारांना खुश ठेवण्यासाठी "लाड" पुरवले जात आहेत. दिवाळीतील मतदारांची " राजकीय ओवाळणी " कुणाला लाभदायी ठरणार हे येणारा काळच ठरवेल.
दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात.मागील पाच वर्षांपासून निवडणूका झाल्या नसल्याने राजकीय मंडळी हिरमुसली होती. दरम्यान प्रशासकीय "राज" लागु झाल्याने विकास कामांना खीळ बसली होती. न्यायालयाने रखडलेल्या निवडणूका तात्काळ घेण्यात यावे असे सूचवल्याने निवडणूक आयोग कामाला लागले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिका निवडणूका संदर्भात हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्ष व, नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.सर्वच राजकीय पक्ष "सरस" उमेदवारांच्या शोधात आहे. भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असल्याने सर्व राजकीय मंडळीच ईकडे बारकाईने लक्ष असतं.
भाजप, राष्ट्रवादीत चूरस : राज्यात भाजप, राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गटाची) महायूती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र स्वबळाची भाषा करीत असल्याने वेगवेगळे लढणार हे निश्चित झाल्याचे समजते.भाजपाचे खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) आमदार प्रताप पाटील चिखलीकर याचं राजकीय वैर असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना हाताशी धरून श्री.चिखलीकर हे लक्ष घालणार असल्याने दोघातच चूरस होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ईतर पक्षाचा फारसा प्रभाव नसला तरी मतांची विभागणी केली जाईल याचा फटका कुणाला बसणार हे येणारा काळच ठरवेल.
ऊमेदवारीसाठी फिल्डिंग : तालुक्यातील मनसे, वंचीत बहूजन आघाडी,एमआयएम, महायुती,महाविकास आघाडीतील भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवकानी आतापासूनच उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर" फिल्डिंग " लावण्यासाठी खटाटोप सुरू केल्याचे दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठीं कुणाला "प्रसन्न " होईल हे पाहण ऊत्सुकतेच ठरणार आहे.
इच्छुकांची मांदियाळी : होऊ घातलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी दिवसेंदिवस भावी उमेदवारांची गर्दी वाढते आहे.यात प्रामुख्याने नगराध्यक्ष पदांसाठी भाजपाकडून विनोद पाटील चिंचाळकर, भगवान दंडवे, विठ्ठल पाटील धोंडगे, खन्ना पाटील चिंचाळकर,काँग्रेस कडुन सुभाष पाटील किन्हाळकर, संदीप पाटील गौड, शिवसेना (अजित पवार गट) राजेश्वर देशमूख, शिवसेना शिंदे गटाचे माधव पाटील वडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आनंद चिठ्ठे,दिलीप तिवारी,तर अपक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List