करंजी रोड येथे बालकामगाराची सुटका बालकाला कामावर ठेवणे भोवले : मालकावर गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज
पांढरकवडा : ( राजीव आगरकर )मौजा करंजीतील समीर ऑटोमोबाईल अॅण्ड सर्व्हिसिंग सेंटर येथे अल्पवयीन मुलाला मोटरसायकल दुरुस्तीच्या कामावर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संयुक्त कृतीदलाने 24 नोव्हेंबर रोजी दुपारी टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी समीर शाहीर पठाण (वय 23, रा. वार्ड क्र. 2, करंजी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी संकेश गणेश नामपेल्लीवार (वय 26, बालकामगार समन्वयक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट) यांनी पांढरकवडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. जिल्हाधिकाऱ्यांच्या
बालकामगार नियंत्रणाखालील कृतीदलाने दिलेल्या निर्देशानुसार ही धाड कारवाई करण्यात आली. धाडीत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आकाश बुर्रबार, दुकाने निरीक्षक विजय गुल्हाणे आणि तालुका होमगार्ड समादेशक निरंजन मलकापुरे उपस्थित होते. तपासादरम्यान सर्व्हिस सेंटरमध्ये अल्पवयीन मुलगा मोटरसायकल दुरुस्तीची कामे करत असल्याचे निष्पन्न झाले. हा व्यवसाय धोकादायक उद्योगात मोडत असल्याने अल्पवयीनाकडून काम करवून घेणे हा स्पष्ट कायदा भंग असल्याचे कृतीदलाने नमूद केले. अल्पवयीन मुलाला तेथून सुटका करून ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला बाल कल्याण समिती, यवतमाळ यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List