पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ; दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या

पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ; दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या

आधुनिक केसरी न्यूज 

महेश गायकवाड 

सोलापूर : पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नराधमाने दुकानात किराणा साहित्य आणण्यासाठी गेलेल्या मुलींवर अत्याचार केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणातील आरोपी देखील अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दोन अल्पवयीन मुली गावातील एका किराणा दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन दुकानातील एका अल्पवयीन मुलाने या दोन्ही मुलींवर अत्याचार केला. ही घटना दुकानाच्या परिसरातच घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आईच्या फिर्यादीवरून गुन्हा  दुकानदार मुलावर दाखल करण्यात आला आहे.मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या फिर्यादीवरून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, घटनेच्या वेळी दुकानात इतर कोणी होते का किंवा अशा प्रकारचे कृत्य वारंवार घडत होते का, याचाही शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलांकडूनच असं कृत्य घडल्याने परिसरात चिंतेचं वातावरण आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात  पैठणच्या गोदावरीत सोनं? चाळण्यां  टोपल्या सह महीला, पुरुष गोदापात्रात 
आधुनिक केसरी न्यूज  दादासाहेब घोडके  पैठण : येथील गोदावरी नदीपात्रात,  दशक्रिया विधी घाट ते गणेश घाटा पर्यंत नदीचे पाणी ओसरल्यानंतर...
पंढरपुरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ; दुकानात गेल्या अन् नराधमाच्या तावडीत सापडल्या
जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा
भिगवण प्रकरण तापलं ! उद्या इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं ? घनश्याम हाकेंचा सवाल
लाल दहशतीचा शेवट जवळ; 10 कोटींचा इनामी नक्षल नेता ‘देवजी’ शरण
शहीद झाल्यावर गर्दी होते, मग निवृत्त सैनिकाचा जिवंतपणी सन्मान का नाही ?
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू