विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त "नागसेन - मिलिंद" या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा प्रारंभ छत्रपती संभाजीनगर येथील पी. ई. एस. इंजीनियरिंग कॉलेज, नागसेनवन येथे होत असल्याचे मुख्य संयोजक भिक्खू करुणानंद महाथेरो यांनी कळविले आहे.
 या संदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंती निमित्त "नागसेन- मिलिंद" या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा प्रारंभ १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता होत आहे.  या भव्य व्याख्यानमालेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या हस्ते होत असून यावेळी प्रमुख उपस्थिती छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त श्री सागर देशमुख हे असणार आहेत. याप्रसंगी भिक्खू विनयरक्खित महाथेरो (बैंगलोर) यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे. तर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भिक्खू प्राचार्य डॉ खेमधम्मो, मुळावा हे असणार आहेत. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. भारसाखळे एम. एच.(अध्यक्ष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान,अकोला) हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्षक अभियंता श्री एस एस भगत असणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, श्री दीपक खरात हे राहणार आहेत. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य अँड. जयमंगल धनराज यांचे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी नगर स्मार्ट सिटीचे उपायुक्त रवींद्र जोगदंड हे उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील अनुयायांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक भिक्खू करूणानंद महाथेरो (संचालक, द ग्रेट हॅपिनेस युट्युब चॅनल) यांनी आणि नागसेन मिलिंद व्याख्यानमाला व्यवस्थापन समितीने केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..! विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त "नागसेन - मिलिंद" या तीन दिवसीय...
सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता