नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 

नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील इस्लामपुरा येथील दुर्दैवी घटना 

नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरातील देगलूर नाका भागातील एम जी आर गार्डन जवळील एका नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली असून सदरील बालकांचे वय ७ ते १० वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सदरील घटना ही महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या नाल्याच्या कामानिमित्त खडयात साचलेल्या पाण्यामुळे ही घटना घडली आहे. नांदेड येथील देगलूर नाका भागातील एम जी आर गार्डन जवळ महापालिकेच्या वतीने नाल्याचे बांधकाम सुरू आहे. इस्लामपुरा येथील ७ ते १० वर्ष वयाची बालके खेळत होती. खेळता खेळता त्यातील काही जण नाल्याच्या खड्यातील पाण्यात पडले. त्यावेळी काही बालकांनी ओरडाओरड केल्यामुळे या भागातील नागरीक धावत आले व खड्यात पडलेल्या बालकांना बाहेर काढण्याच्या अगोदर ही चार बालके पाण्यात बुडून दगावली आहेत. ही सर्व बालके इस्लामपुरा येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत झालेल्या बालकात महमंद अदनान महंमद फिरोज, महंमद अली महंमद इद्रीस, सय्यद इरफान सय्यद फिरोज व इतर एका जणांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली  नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील देगलूर नाका भागातील एम जी आर गार्डन जवळील एका नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!
सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे