मृत्यूचा माझा अजून थोडा 'नकार' बाकी आहे..!
आजारी महिला रुग्ण वाहिकेनी पोहचली भोकरच्या पोस्टात गुंतवणुकीच्या पैशानी झाला ऊपचार पतीने केली धडपड
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : रायखोड (ता. भोकर) येथील एका वृध्द महिलेवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.दरम्यान पदराला बांधून ठेवलेला पैका आडका संपल्याने पुढिल उपचार थांबला.महिलेनी डाक कार्यालयात गूंतवणुक केलेली रक्कम होती.पतीने चक्क रुग्णवाहिकेतून पत्नीला गूरूवारी (ता.नऊ)डाक कार्यालयात आणले आणि अधिका-यानी तात्काळ पैसे दिल्याने मरणाच्या वाटेवर असणा-या महिलवर उपचार झाल्याने जीव वाचला.आयूष्याचा अजून माझा" करार "बाकी आहे..मृत्युचा अजून थोडा "नकार" बाकी आहे अशी खुणगाठ सदरील महिलेनी मनी बांधल्याचे दिसून आले.
मागील चार महिन्यांपासून तालुक्यात धूव्वाधार पावसाने झोडपून काढले.परीणामी वातावरणात बदल झाल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. " व्हाॅयरल इन्फेक्शनने " डोके वर काढले घरोघरी आजारी रूग्णांची संख्या वाढत गेली,सरकारी आणि खासगी रूग्णालयात उपचारासाठी गर्दी झाली.यात बालक व वृध्दाची लक्षणीय संख्या होती. भोकर- ऊमरी रस्त्यावर असलेल्या रायखोड येथील रहिवासी मारूती मोरे कुटुंबियांची जेमतेमच परिस्थिती असल्याने आपला संसार गाडा हाकत होते. दोन मूल,एक मुलगी , नातु नातवंडं असा परिवार आहे.अशातच विठाबाई मारोती मोरे (वय ७२) ह्या आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान जवळील पैसा संपल्यावर उपचार थांबला. विठाबाई यांनी मागील दोन वर्षापुर्वी येथील डाक कार्यालयात "महिला सन्मान योजने" अंतर्गत काहि रक्कम गुंतवणूक केली होती. याची माहिती विठाबाईनी आपला पती मारूती यांना दिली. मारुतीनी तातडीने रूग्ण वाहिका भाड्याने करून गुरुवारी (ता.नऊ) पत्नीला थेट नांदेडहुन भोकरच्या डाक कार्यालयात आणले.साहेब माझी पत्नी फार गंभीर आजारी आहे.तीच्या उपचारासाठी पैसे नाहीत आपल्याकडे काहि रक्कम गुंतवणूक केली आहे. ते जर मिळाले तर ऊपचार होईल अन् जीव वाचेल अशी अपेक्षा व्यक्त केली.तेथील पोस्टमास्तर एस.नलावाड, डाक सहाय्यक स्नेहकांता गायकवाड,यांनी घटणेचे गांभिर्य लक्षात घेता रुग्ण वाहिकेजवळ जाऊन तात्काळ पैसे दिले. यावेळी डाकनिरीक्षक प्रवीण भांजी,डाक सहाय्यक कैलास पाटील, विजयकुमार कदम,शैलेश चक्ररवार, सुरेश सिंगेवार यांची उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List