कर्तव्यनिष्ठ तहसीलदारांची जनतेला पसंती..!
प्रशांत पाटील यांच्या कार्यकुशलतेमुळे संग्रामपूर तालुक्याचा ‘चेहरामोहरा’ बदलला
आधुनिक केसरी न्यूज
संग्रामपूर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. अनेक अधिकारी येथे येतात व जातात; मात्र तालुक्यात रुजू होऊन एक वर्षाच्या आत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धतीमुळे तालुक्याचे चित्रच पालटले आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या जनसामान्यांच्या तातडीच्या समस्या सोडविण्यात त्यांनी दाखवलेली तत्परता नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. शेत रस्ते नसल्याने शेतातील तोंडाशी आलेला घास गमवावा लागत होता; शेतमाल वाहतूक करणे अवघड झाले होते. तहसीलदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाधावर प्रत्यक्ष जाऊन रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले. परिणामी, शेतमाल शेताच्या बांधापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता सुकर रस्ते उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आनंदाने शेती करत आहेत.
“वंचित, शोषित व पीडित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन तत्काळ तोडगा काढणारे तहसीलदार म्हणजे प्रशांत पाटील!”
– आशीष धुंदळे, युवा तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, संग्रामपूर
“शेतकऱ्यांच्या समस्यांवर बाधावर जाऊन थेट निराकरण करणारे आणि न्याय देणारे तहसीलदार पाटील हे आदिवासी बहुल तालुक्याला लाभलेले पहिले अधिकारी ठरले आहेत.”
– नंदकिशोर पुंडे, शेतकरी, मनार्डी
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List