ग्राम वडशींगी येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जा : 28 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंग येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोप करण्यात आला.आषाढ पौर्णिमा दिनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पठणाची सुरुवात करण्यात येते . विहारामध्ये उपासक उपासिका आणि सहानु बालक या सर्वांनी मिळून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण केल्या जाते जवळजवळ तीन महिने हा ग्रंथ पठण केल्या जातो आणि शेवटी या ग्रंथाचा समारोप वंदना, बुद्ध वंदना आणि सरनतय गाथा घेऊन या कार्यक्रमाची सांगता केल्या जाते आणि नंतर भोजनदान दिले जाते. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ पठण समारोपाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक आणि त्याची कार्यकारणी यांनी सुद्धा भेट दिली तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर आणि त्यांची कार्यकर्ते यांनी सुद्धा भेट दिली. ग्रंथाचे पठण निरंजन भगत यांनी केले. यावेळी मधुकर भगत, पंजाबराव भगत, कैलास भगत लोकपाल भगत, भास्कर भगत, नितीन भगत, भाग्यश्री लोकपाल भगत, सुमन भगत, पर्वताबाई भगत, तसेच रमाई महिला मंडळ वडशिंगी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली. तसेच या ग्रंथ समारोपाला पूजनीय भंते यांची सुद्धा उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक वंचित नेते साहेबराव भगत,तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर,जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, एडवोकेट सावळे,डॉ वाकोडे, पत्रकार उत्तम वानखडे, समता सैनिक दल सैनिक, वंचित बहुजन आघाडी महिला माजी तालुकाध्यक्ष वंदनाताई भगत, भीमराव वानखडे. सरपंच पती सुनील वानखडे,तसेच ग्राम वडशिंगी येथील उपासक उपासिका आणि सहान बालक उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List