येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले
आधुनिक केसरी न्यूज
नितीन राजे.
सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यात गोरेगाव (निम.) ते अंबवडे जाणारे येरळा नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्याच् प्रवाहात सुरेश रघुनाथ गायकवाड वय - ४७ रा. अंबवडे, ता. खटाव. जिल्हा.सातारा हे वाहून गेले आहेत. दोन दिवस पडणाऱ्या संततदार पावसामुळे खटाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येरळा नदी दुथडी वाहत असून येरळाकडच्या लोकांना धोक्याचा इशारा शासनाने देण्यात आलेला आहे. तरी देखील काल सायंकाळी गोरेगाव अंबवडे यांना जोडणाऱ्या पुलावर पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यावेळी सुरेश गायकवाड यांनी फुल ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले इतर लोकांनी समजून सांगून देखील त्यांनी ना ऐकल्याने ते वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेची माहिती वडूज पोलीस स्टेशनला मिळाले असून शोधकार्य चालू आहे अद्यापही सदर व्यक्तीचा शोध लावला नाही. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List