सातपुड्याच्या डोंगरात दमदार पाऊस ; नदी नाले झाले प्रवाहित
तहसीलदार पवन पाटील यांच्याकडून गोराळा धरणाची पाहणी
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : आज सातपुड्याच्या डोंगरात परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि एकदाचे नदी नाले छोटे छोटे ओढे तुडुंब पाण्याने वाहू लागले. डोंगराच्या पायथ्याशी असलेले गोराळा आणि राजुरा खुर्द लघु प्रकल्प पाण्याने भरले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले. तर जळगाव जामोद चे तहसीलदार पवन पाटील यांनी गोराळा धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पावसाची संतदार असे सुरू राहिली तर धरणाच्या सांडव्यामधून स पाण्याचा मोठा प्रवाह विसर्जित होऊ शकतो आणि त्यामुळे जळगाव शहरातील नदी काठावरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो त्यामुळे नदी काठावरील लोकांनी सुरक्षितता बाळगावी असं आवाहन सुद्धा तहसीलदार यांनी केल आहे.
खरंतर पावसाळा उलटून साडेतीन महिन्याचा कालावधी निघून गेला होता. परंतु सातपुड्याच्या डोंगरात पाहिजे तसा पाऊस होत नव्हता. शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळेल एवढाच पाऊस यायचा आणि निघून जायचा. आतापर्यंत नदी नाल्यांना साधा पूरही आला नव्हता. विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. अशी परिस्थिती नदी नाले तलावाची झाली होती. लोक चर्चा करायचे. पावसाळा संपत आलाय पण अजूनही नदी नाल्यांना साधा पूर गेला नाही. असं फार क्वचितच होतं. यावर्षी सार्वत्रिक पाऊस पाहायला मिळालाच नाही. त्यामुळे कधी या भागात तर कधी त्या भागात असा पाऊस पडायचा. परंतु काल रात्रीपासूनच सातपुड्याच्या डोंगर रांगांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे छोटे छोटे ओढे प्रचंड आवाज करत वाहू लागले.राती पडलेल्या पावसाने सकाळीही आपली बॅटिंग सुरूच ठेवली त्यामुळे नदी नाल्यांचा खळखळ आवाज डोंगरात घुमू लागला. पाऊस एवढा जोराचा होता की काही वेळातच गोराळा राजुरा खुर्द आणि हत्ती पाऊल या लघु प्रकल्पाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. कमी जास्त प्रमाणात पाऊस असा सुरू राहिला तर उद्या सकाळी या तीनही लघु प्रकल्पाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग होवू शकतो.
जळगाव जामोद शहरात तर सलग दोन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे जळगावकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.खरं तर आज पडलेल्या या पावसाने तालुक्यासह जळगाव वासियांना आनंदच झाला पण हाता तोंडाशी आलेलं सोयाबीनचे पीक हातातून जाते काय या भीतीच्या सावटानं इथला शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांची झाली आहे. असो, परतीच्या पावसामुळे नदी नाले धरणे तुडुंब भरली, प्रवाहित झाली खरी पण शेत माऊलीत राबणाऱ्या बळीराजाच्या पदरात काय वाढून ठेवलं हा येणारा काळच सांगेल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List