अपहार प्रकरणी ग्रामसेवक निलंबित..!
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : रेणापूर येथील प्रकार कैलास कानिंदेनी केली तक्रार
भोकर रेणापूर(ता.भोकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगणमताने गावातील विविध विकास योजनेअंतर्गत आलेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास निलंबित केले आहे.यामूळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या खात्यातील (३१,८१,२९९) रक्कमेचा अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सदर अपहार ग्रामसेवक विकास वामन भारती यांनी केला असून चौकशीत ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कारवाई केली.डॉ. कैलास कानिंदे व गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.सरपंच लक्ष्मीबाई कानबा गोरेकर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. त्यांच्यावरही कारवाईची मागणी करून अपहाराची पूर्ण रक्कम वसूल करावी व कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आहे. सदरील प्रकरणात केवळ ग्रामसेवक दोषी नाही तर पंचायत समितीतील लेखा परीक्षण, वित्त विभाग यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.अपहार प्रकरणी तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामसेवकाची तक्रार दाखल झाल्यानंतर मी स्वताह चौकशी केली व सदरील रक्कमेच्या बाबतीत असलेली महत्वाची कागदपत्रे पंचायत समितीत दाखल करावे अशी सुचेना केली पण ते देण्यास टाळाटाळ करीत असल्याने निलंबित केले आहे.सविस्तर माहिती मिळाल्यानंतर कीतीचा अपहार झाला हे स्पष्ट होईल.सदरील रक्कम हि अंदाजीत आहे.
(गटविकास अधिकारी : एम.एम.केंद्रे,भोकर)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List