भरधाव बस झाडावर आदळली : बारा विद्यार्थीनी जखमी

भरधाव बस झाडावर आदळली : बारा विद्यार्थीनी जखमी

आधुनिक केसरी न्यूज
 
पेठ : पेठ आगाराची भरधाव बस शुक्रवारी सायंकाळी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली. या भीषण अपघातात बारा विद्यार्थीनींसह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला. पेठ आगाराची बस (एमएच १४ बीटी ३५९८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पेठहून आडगावकडे जात होती. मात्र चालकाने नित्याच्या मार्गाऐवजी बस अंधुटे-मागनि या मार्गे नेली. भरधाव गतीने जात असताना एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस लगतच्या सागाच्या झाडासह दगडावर आदळली. धडकेनंतर बस जागीच थांबली. या अपघातात आरती जनार्दन महाले (१७), मोनिका विलास दरोडे (१६), अंकिता बाळू गुजर (१८) रा. हनुमंतपाडा, भुवन) या विद्यार्थीनींच्या डोक्याला व चेहऱ्यावर मार लागला. इतर विद्यार्थ्यांसह प्रवासी किरकोळ जखमी झाले. अचानक झालेल्या धडकेने प्रवासी व विद्यार्थीनी लोखंडी बाकांवर आपटल्याने जखमी झाले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मदत केली. जखमींना भुवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अपहार प्रकरणी ग्रामसेवक निलंबित..! अपहार प्रकरणी ग्रामसेवक निलंबित..!
आधुनिक केसरी न्यूज भोकर : रेणापूर येथील प्रकार  कैलास कानिंदेनी केली तक्रार भोकर  रेणापूर(ता.भोकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि ग्रामसेवकांनी...
भरधाव बस झाडावर आदळली : बारा विद्यार्थीनी जखमी
पूरामुळे शाळकरी विद्यार्थी अडकले; स्थानिक व प्रशासनाच्या तत्परतेने सुरक्षित घरी पोहचवले..!
बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट 
भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात
मनपाच्या  दोषी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी
पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या