ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबवा सकल ओबीसी समाजाचे तहसीलदार यांना निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
सुभाष घोलप
औढा नागनाथ : ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबविण्यात यावी तसेच राज्यात ५८ लाख कुणबी मराठा नोंदी गैरकायदेशीर असून या नोंदी रद्द करण्यात याव्यात , न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात यावी. यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे प्रभारी तहसीलदार प्रवीण ऋषी यांना दिनांक ०२ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता निवेदन देण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे नी ओबीसी समाजातील मोठा घटक असलेल्या धनगर समाजाबद्दल अश्लील शब्द वापरल्याने मनोज जरांगेवर गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात यावी, जातीय जनगणना करून महाराष्ट्रातील ओबीसी लोकसंख्या जाहीर करावी, ओबीसी समाजातील कर्मचारी व अधिकारी यांची विभाग अंतर्गत त्वरित पदोन्नती देण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आता व भविष्यात देण्यात येऊ नये .यासाठी दिनांक ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता येळी फाटा येथे सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मोठा रास्ता रोको करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे .निवेदनावर बाळू सांगळे, विठ्ठल सांगळे ,विलास आघाव, हनुमान गीते ,रमेश सानप , जगन्नाथ सांगळे ,जगदीश सांगळे राजेश विधारे ,राजकुमार दराडे, गजानन नागरे ,मनोज देशमुख, भगवान सोनवणे ,रामप्रसाद, नामदेवराव देवकर ,दीपक सांगळे, गोकुळ सांगळे ,पांडुरंग सांगळे ,जयराम कुटे ,शामराव घुगे ,सुरेशराव सांगळे ,साहेबराव सानप ,उमाजी दराडे ,गजानन नागरे ,एकनाथ नागरे यांच्यासह सकल ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List