भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे

भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे

आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : भटक्या विमुक्त समाजावरचा गुन्हेगारी जमातीचा कलंक आजच्याच दिवशी १९५२ साली दूर करण्यात आला. त्याची स्मृती जागवण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तसेच, भटक्या विमुक्त जाती-जमातींना विविध दाखले, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या अडचणी येतात त्या लक्षात घेता त्यांना सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे, असे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज घोषित केले. 

समाजातील प्रत्येक मागासलेल्या घटकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या समाजाची प्रगती केली आहे. भटक्या विमुक्त घटकांनीही मनाशी निर्धार करून आपली प्रगती करावी. त्यासाठी न्यूनगंड बाजुला ठेवावा. शासन आपल्या पाठिशी आहे, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. 

एमजीएम विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात आज भटके विमुक्त दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, इमाव संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष राहुल चव्हाण, सहसंचालक प्रशांत शिर्के, भटके विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण घुगे, उपसंचालक जलील शेख, तांडा वस्ती अध्यक्ष राजेंद्र राठोड, सहायक संचालक एम. आय. शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री श्री. सावे म्हणाले की, भटके विमुक्त दिवस साजररा करणे हा एक प्रकारचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातही या समाजाने स्वराज्यासाठी योगदान दिले आहे. गुन्हेगारीचा शिक्का पुसल्यानंतरही या लोकांच्या जीवनमानात फारसा बदल होऊ शकला नाही. त्यांच्या जीवनमानात बदल होऊन प्रगती करण्यासाठी शिक्षण, रोजगाराला चालना देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासनामार्फत राज्यात ६३ वसतिगृहे बांधण्यात आली. शालेय ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच, रोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना सुरु करण्यात आल्या. आरोग्य, निवास यासारख्या प्रगतीचे मापदंड मानल्या जाणाऱ्या निकषांच्या पूर्ततेसाठीही शासनाच्या विविध योजना आहेत.आता ही आपली जबाबदारी आहे, की आपण या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावयास हव्या. योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्र आवश्यक असतात. या कागदपत्रांची पूर्तता करणे सतत भटक्या असणाऱ्या समाजाला अशक्य होते. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र समिती तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता अशी कागदपत्रे मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे श्री. सावे म्हणाले. 

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपल्या देशात अनेक जाती, जमाती या मागासलेल्या होत्या. या जातींनी शिक्षणाची कास धरून आपली व आपल्या समाजाची प्रगती साध्य केली आहे. भटक्या जमातींनीही शिक्षणाकडे लक्ष द्यावे. चांगल्या उच्च पदावर जावे, आपला उत्कर्ष करताना आपल्या समाजबांधवांनाही मदतीचा हात द्यावा. मनाशी निर्धार करून आपली प्रगती साध्य करावी. त्यासाठी शासन आपल्या पाठिशी आहे. या कार्यक्रमात राहुल चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, खा. डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीमती सोनाली मुळे यांनी केले. या कार्यक्रमात भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती व संघटना, संस्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. त्यास उपस्थितांनी दाद दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ
आधुनिक केसरी न्यूज ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते....
माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे
पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट
राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!
मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम