चांदेकरवाडी, सोन्याच्या शिरोली  चोरीतील चोरटे जेरबंद राधानगरी पोलिसांना यश..!

चांदेकरवाडी, सोन्याच्या शिरोली  चोरीतील चोरटे जेरबंद राधानगरी पोलिसांना यश..!

आधुनिक केसरी न्यूज

कुडूत्री : चांदेकरवाडी,सोन्याची शिरोली येथे हिसडा मारून चोरी केलेल्या चोरट्यांना ताब्यात घेऊन संपूर्ण  राधानगरी पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत करत चोरट्याने जेरबंद केले. अधिक माहिती अशी राधानगरी पोलीस हद्दीमध्ये सलग जबरी चोरी झाल्याने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना तातडीने तपास करून आरोपींना पकडण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे ॲक्शन मोडवर येत त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर व शेळके तसेच पोलीस अमलदार किरण पाटील यांच्यासह एक पथक तैनात केले या पथकाने राधानगरीतील चांदेकरवाडी, बाचणी परिसर तसेच सोन्याची शिरोली परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांना  संशयित इसमांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्यामधील संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर यांनी प्रयत्न केले असता त्यांना कागल पोलीस ठाण्यामधील अमलदार युवराज पाटील यांनी चोरट्यांची माहिती दिली त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल खामकर, शेळके व किरण पाटील यांच्यासह कागल पोलीस ठाण्यातील युवराज पाटील,पोलीस अमलदार कुरणे, यांनी संयुक्तरीत्या मिळून या चोरीतील मुख्य आरोपी समीर रमजान मकानदार वय 23 वर्ष राहणार उजळाईवाडी तालुका शिरोळ याला उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने चांदेकरवाडी व सोन्याची शिरोली येथील चोरी ही दोन सहकाऱ्यांच्या मदतीने केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यापैकी सार्थक नितीन तिवडे वय 19 वर्ष राहणार उमरवाड याला अटक केली असून दुसरा सह आरोपीचा शोध पोलीस करत आहेत.

त्यानंतर सदर आरोपी समीर रमजान मकानदार वय 23 वर्ष राहणार उमरवाड याला ताब्यात घेतले असून राधानगरीचे पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले यांच्या ताब्यात दिले असता त्यांनी सदर आरोपींची तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केला असून चांदेकरवाडी चोरीतील एक तोळ्याचे मणी मंगळसूत्र व पाच ग्रॅम चा सोन्याचा गुंड असे एकूण एक लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल तसेच सोन्याची शिरोली चोरीतील 42 हजार रुपये चे सहा ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र हस्तगत करून शंभर टक्के रिकवरी केली आहे.तसेच गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर गाडी जप्त केली आहे तसेच या भुरट्या चोरांना अटक केली असून सह आरोपीचा शोध सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, प्रणाली पवार,कृष्णात खामकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके, अमलदार किरण पाटील, भोपळे तसेच कागल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार युवराज पाटील व कुरणे यांनी केली आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चांदेकरवाडी, सोन्याच्या शिरोली  चोरीतील चोरटे जेरबंद राधानगरी पोलिसांना यश..! चांदेकरवाडी, सोन्याच्या शिरोली  चोरीतील चोरटे जेरबंद राधानगरी पोलिसांना यश..!
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : चांदेकरवाडी,सोन्याची शिरोली येथे हिसडा मारून चोरी केलेल्या चोरट्यांना ताब्यात घेऊन संपूर्ण  राधानगरी पोलिसांनी मुद्देमाल केला...
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या : हर्षवर्धन सपकाळ
कोयना धरनातून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जिल्हाधिकारी संतोष पाटील व पाटणचे तहसीलदार अनंत गुरव स्थलांतरित कुटुंबाना दिलासा
अस्मानी संकटात सापडलेल्या किनवट माहूर च्या जनतेला एकटं सोडणार नाही : कपिल नाईक
वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक..!
नेवासा फाट्यावर फर्निचर दुकानात भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळुन मृत्यू